

तालुका ः कोपरगाव
.........................
KPG26B10910 KPG26B10911 KPG26B10909
कोपरगाव : मतदानाचा हक्क बजावताना आमदार आशुतोष काळे.
कोपरगाव : मतदान करताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे. समवेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे.
कोपरगाव : मतदानाचा हक्क बजावताना आमदार विवेक कोल्हे.
कोपरगावमध्ये ९८.३० टक्के मतदान
कोपरगाव, ता. २ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव येथील दोन मतदान केंद्रांवर ५२९ मतदारांपैकी ५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण ९८.३० टक्के मतदान झाले.
आमदार आशुतोष काळे हे शेतीपूरक, शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांची विरोधी गटाचे सुधीर म्हस्के यांच्याशी थेट लढत होत आहे.
एकूण ५२९ मतदारांपैकी विविध सेवा सोसायटी मतदारसंघातील १०९ पैकी १०८ (९९.०८ टक्के), बिगरशेती मतदारसंघातील २४४ पैकी २३६ (९६.७२ टक्के), तर शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघातील १७६ पैकी सर्व १७६ (१०० टक्के) मतदारांनी मतदान केले.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आमदार विवेक कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावला. आमदार आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनीही मतदान केले.
सेवा सोसायटी मतदारसंघातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.