

Tight Security Arrangements for Koregaon Bhima Shauryadin
Sakal
पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच शांततेत कार्यक्रम पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा परिसरात सुमारे साडेसात हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली.