

Heavy Police Deployment for Vijay Stambh Ceremony
Sakal
पुणे : ‘कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच सर्व सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.