

A 62-year-old man was swept away along with his motorcycle while attempting to cross the submerged Koregaon Mul barrage amid heavy flooding in the Mula-Mutha River. NDRF and fire brigade teams have launched a search operation.
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : मुळा मुठा नदीला आलेल्या पुरामुळे कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यावरून प्रचंड वेगात पाणी वाहत असताना या पाण्यामध्ये एक व्यक्ती दुचाकीसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे नाव गंगाधर साहेबराव गोते,वय अंदाजे ६२ असून त्याचा शोध गावातील काही नागरिक घेत असल्याची माहिती मिळत आहे.आज सायंकाळी सहा ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.