Pune News: कोरेगाव पार्कमध्ये ओव्हरहेड केबलचा सुळसुळाट; परिसराचे विद्रूपीकरण, वाहतुकीला अडथळा, अपघातांच्या प्रमाणात वाढ

Koregaon Park: कोरेगाव पार्क परिसरात अनधिकृत ओव्हरहेड केबल्समुळे विद्रुपीकरण व अपघातांचा धोका वाढला आहे. कोरेगाव पार्क, ओव्हरहेड केबल, पुणे महापालिका या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Pune News

Pune News

sakal

Updated on

मुंढवा : कोरेगाव पार्क परिसरात जागोजागी अनधिकृतपणे ओव्हरहेड केबलचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात यामुळे बाधा येऊन विद्रूपीकरण झाले आहे. अनेक ठिकाणी केबल झाडांवर किंवा रस्त्यांवर लटकलेल्या असतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. लटकलेल्या केबल दुचाकीत अडकून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. महापालिका प्रशासनाने या भागातील केबल काढाव्यात, तसेच परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com