Koregaon: कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्याचे रुंदीकरण कूर्मगतीने; रोजच्या वाहतूक कोंडीने चालक हैराण, कामाचा वेग वाढविण्याची मागणी
Koregaon Park: कोरेगाव पार्क ते मुंढवा रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत मंद गतीने सुरू असल्यामुळे दररोज वाहनांची कोंडीत अडकावे लागते. स्थानिक रहिवासी आणि चालक महापालिकेकडे कामाचा वेग वाढविण्याची मागणी करत आहेत.
मुंढवा : पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाचे काम अतिशय कूर्मगतीने सुरू असल्यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूने रोज वाहतूक कोंडी होते.