Overnight Political Developments in Kothrud
sakal
कोथरूड : 'पुण्यवंत पाताळलोकी नेला' या संत जनाबाईंच्या अभंगाचा दाखला देत, 'निष्ठावंतांना डावलले गेले' असा सूर भाजपच्या गोटातून उमटू लागला होता. यामुळे निवडणुकीत विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पक्षाची 'डॅमेज कंट्रोल' करणारी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. वरिष्ठ पातळीवर चक्रे फिरली आणि रात्रीतून कोथरूडमधील उमेदवारांचे चित्र बदलले.