

पुण्यातील प्रतिष्ठित आणि शांत समजल्या जाणाऱ्या कोथरूड भागात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी उग्र रूप धारण केले आहे. मागील काही आठवड्यांमध्ये येथे अनेक गंभीर गुन्हे घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, या भागातील नागरिकांनी "कोथरूडच बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड असं नव्हतं" असे बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला आहे.