Pune : कोथरूडकरांना हवा लोकशाहीचा अनुभव ! महापालिका निवडणूक नाही, कमीत कमी वार्डसभा तरी घ्या...

Pune : वार्डसभेच्या माध्यमातून मिळावा लोकशाही चा अनुभव - कोथरुडकरांची अपेक्षा
 PMC
PMCsakal

कोथरुड : लोकप्रतिनिधीवीना असलेल्या महानगरपालिकेत वर्षभराहून अधिक काळ प्रशासक राज सुरु आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका होई पर्यंत लोकप्रतिनिधी असणार नाहीत. प्रातिनिधीक लोकशाहीची सवय लागलेल्या जनतेला वार्डसभेच्या माध्यमातून स्वतःच्या नागरी समस्या सोडविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यातून जनतेला ख-या लोकशाही व्यवस्थेचा अनुभव देखिल मिळेल. अधिकार शाहीचा अनुभव तर नेहमीचाच आहे.

 PMC
Pune News: पुण्यात चप्पल चोर! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधी नसतील तेव्हा अधिका-यांनी जनतेचे प्रश्न समजून घेणे व सोडवणेसाठी वार्डसभा, मोहल्ला सभा घेतली तर जनतेच्या भावना, अपेक्षांचे प्रतिबिंब कारभारात पडू शकते. मोहल्ला सभा महिन्यातून एकदा हीत असल्या तरी वार्डसभा झालेल्या नाहीत.त्यासाठी धोरणत्मक निर्णय वरिष्ठ स्तरावर घ्यावा लागेल.

लीला पार्क सोसायटीचे माजी अध्यक्ष मारुती माने म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढणे असो की रस्त्यावरील चेंबर फुटले की निर्माण होणारा प्रश्न, अगदी किरकोळ प्रश्नासाठी देखील नागरिक रात्री अपरात्री लोकप्रतिनिधीशी संपर्क साधायचे. परंतु आता प्रशासक राज आहे. अधिका-यांना भेटायचे असेल वा संपर्क साधायचा असेल तर ठराविक वेळीच तो होवू शकतो. नगरसेवकांकडे बजेट नाही. त्यामुळे प्रश्न घेवून त्यांच्याकडे जायचे तरी कसे असे वाटते.

 PMC
Pune Crime : पुण्यातील धक्कादायक प्रकार! हॉर्न वाजवल्याने तरूणाकडून कारचालकाला मारहाण

चेंज इंडिया फाऊंडेशनचे सचिन धनकुडे म्हणाले की, महापालिकेच्या अधिका-यांनी वार्डसभा स्वरुपात सोसायटी व वस्ती पातळीवर मिटींगा घेवून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्या त्या भागासाठी अर्थसंकल्पात काय आहे हे समजावून सांगावे. लोकांच्या मागणीनुसार विकास कामांचे नियोजन करावे. यानिमित्ताने तरी लोक बोलते होतील. स्वतःचे प्रश्न अधिका-यांपुढे मांडतील.

प्र. स. दंडवते म्हणाले की, दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी क्षेत्रिय कार्यालयात मोहल्ला कमिटीची सभा असते. त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी उपस्थित असतात. येथे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असणे अपेक्षित असते. मात्र बरेचदा येथे फक्त आरोग्यविभागाचे कर्मचारी असतात.

 PMC
Non Veg Restaurants In Pune : मटण थाळीवर ताव मारायचा असेल तर पुण्यातील ही बेस्ट हॉटेल्स पहाच!

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नाशिल्प व सहवास सोसायटी मध्ये नागरिकांसोबत बैठका घेतल्या होत्या. तेथे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोरात उद्यानात देखील त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिका-यांना सुचनाही केल्या होत्या. माजी नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, मंडळे यांनी पुढाकार घेवून अधिका-यांसोबत सभा लावल्यास त्या त्या भागातील नागरी समस्यांचे निराकरण सोपे होईल.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, गेल्या वर्षभरात महापालिकेवर प्रशासक असून नागरिकांच्या सोयीसाठी व भेटणेसाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत महा. सहा. आयुक्त यांनी कार्यालयात उपस्थित रहाणेबाबत आदेश होते व त्यानुसार महा. सहा. आयुक्त उपस्थित असतात. तसेच मोहल्ला कमिटी सभा नियमितपणे होत असतात.

 PMC
Pune Crime : धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात प्रशासन असून नागरिक यांच्या सोयीसाठी पहिले 6 महिने रोज सकाळी स 10 ते 12 या वेळेत महा. सहा. आयुक्त कार्यालयात उपस्थित ठेवण्यात आले आहे. व तद नंतर प्रत्येक सोमवार, गुरुवार स 10 ते 12 उपस्थित असतात. वॉर्ड सभा हे स्थानिक सभासदांनी त्याचे वॉर्डात घेणे आहे, त्यास प्रशासन यांनी आयोजन करणे अभिप्रेत आहे परंतु ती प्रोसिजर थांबली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com