वंचितांसाठी काम करणारांचा सन्मान | Kothrud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचितांसाठी व समरसतेसाठी  काम करणारांचा  स्मृतिचिन्ह देवून  सन्मान करण्यात आला

कोथरुड : वंचितांसाठी काम करणारांचा सन्मान

कोथरुड : कुणी न राहो दुबळा येथे, मनी असा निर्धार जागवू हा विचार समोर ठेवत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, शहरअध्यक्ष जगदीश मुळीक व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समरसता दिवाळी 2021 हा कार्यक्रम एरंडवणा येथे संपन्न झाला. आपल्या कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण केलेल्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे राजाभाऊ गिजरे, गुडविल इंडियाचे कालीदास मोरे, यशोदा फाऊंडेशनच्या उल्का मोकासदार, सुर्योदय सोशल प्रतिष्ठानच्या कोमल पवार, अपंगांसाठी काम करणारे अमोल शिनगारे, सेवा आरोग्य प्रतिष्ठानचे दीपक अष्टपुत्रे, डॉ. हेमंत कोकरे, लहुजी क्रांती दलाचे सुरेश पवार, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, अनुराधा येडके, उमेद फाऊंडेशनचे राकेश सणस, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर, जितेश दामोदरे आदींचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: गणपतीमुळे दूषित होणारे धरणाचे पाणी छटपुजेमुळे दुषित होत नाही का?

संयोजक प्रशांत हरसुले यांनी सांगितले की, कोरोना काळात सर्वच अडचणीत होते . अशावेळी स्वतःच्या अडचणीकडे दुर्लक्ष करत समाजातील समस्या दुर करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांची दखल घेणे आवश्यक होते. तळागाळातील समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारांचा सन्मान व आर्थिक मदत देवून समाज तुमच्या बरोबर राहील हे दर्शवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला.

आमदार पाटील म्हणाले की, देवाने भेद केला नाही पण माणसाने माणसांमध्ये भेद केला. कोरोनाने सगळ्यांना एका पातळीवर आणले. वस्तुस्थितीची जाणीव या संकटामुळे आपल्याला आली. सामाजिक अभिसरणाचे काम समरसतेच्या माध्यमातून होत आहे. कोविड काळात धैर्याने काम करणारांचा सन्मान व वंचितांबरोबर दिवाळी, असा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. रवी ननावरे यांनी आभार मानले.

loading image
go to top