
Kothrud Park
Sakal
कोथरूड : येथील कै. सखूबाई राजूशेठ शिंदे आजी-आजोबा उद्यानाची दुरवस्था झाली असून, उद्यानात तळीरामांचा वावर वाढला आहे. लहान मुले, महिलांची कुचंबणा होत आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. योग्य देखभाल केली जात नसल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.