
पुणे : कोथरूडमध्ये डुकरांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. मृत डुकराच्या शवविच्छेदनातून कावीळसदृश आजाराचे कारण समोर आले. डुकराचे काही अवयव भोपाळमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. महापालिकेने बुधवारी ७६ डुकरांना पकडून निरीक्षणात ठेवले असून, दोन दिवसांनी त्यांना कत्तलखान्यात पाठवले जाणार आहे.