Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Kothrud Road, 467 Trees, Pune Municipal Corporation — कोथरूडमध्ये २० मीटर रस्त्यासाठी ४६७ झाडे तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नसल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतला.
Kothrud Road, 467 Trees, Pune Municipal Corporation

Kothrud Road, 467 Trees, Pune Municipal Corporation

esakal

Updated on: 

पुणे, :कोथरूड येथे २० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी महापालिकेकडून ४६७ झाडे तोडली जात असताना त्यांच्या पुनर्रोपणासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्त नवल किशोर राम यांनी या झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली आहे.

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मृत्युंजयेश्वर मंदिराजवळील ओढ्यापासून सौरभ हॉलपर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता पुढे जी. ए. कुलकर्णी पथाला मिळतो. हिरव्यागार झाडीमुळे हा परिसर कोथरूडचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळखला जातो. सुमारे तीन वर्षांपूर्वी संबंधित जागामालकाने एफएसआयच्या मोबदल्यात २० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठीची जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली. त्यानंतर २०२३ मध्ये रस्त्याच्या आड येणारी ४६७ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल तीन वर्षे झाडे तोडण्यात आली नाहीत. आता गेल्या काही दिवसांत येथील जवळपास १५० झाडे तोडण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com