अरे बापरे ! कोथरूड आता ग्रीन झोन नव्हे, तर रेडझोनमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

लाॅकडाउन शिथील झाले. दारूची दुकाने सुरू झाली आणि लोकांचे वेगवेगळ्या भागातून येणे जाणे सुरू झाले. त्याचा परिणामच सध्या जणू कोथरुडमध्ये दिसत आहे.

कोथरूड (पुणे) : ग्रीन झोनमध्ये असलेल्या कोथरूडमधील आज पर्यंतच्या कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या 19 पर्यंत पोहचली आहे. यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला असून पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या उपचार सुरू असणा-या पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या 13 आहे.  

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्वाची बातमी: वाचा सविस्तर

कोथरूडच्या वस्ती भागात कोरोनाने शिरकाव करू नये म्हणून पोलिस, महानगरपालिका व आरोग्य विभागाने कठोर मेहनत घेतली. त्याला लोकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. परंतु लाॅकडाउन शिथील झाले. दारूची दुकाने सुरू झाली आणि लोकांचे वेगवेगळ्या भागातून येणे जाणे सुरू झाले. त्याचा परिणामच सध्या जणू कोथरुडमध्ये दिसत आहे.

क्वारंटाइन केंद्रात की बारला बसलेत?

सोसायटी बरोबरच आता दाट लोकवस्ती असलेल्या भागात कोरोनाचे रूग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. औषध विक्रेता, डाॅक्टर, हाॅटेल चालक, वाहन चालक, किराणा व्यापारी यांचा समावेश कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णात असल्याने त्यांच्या संपर्कातील आणखी काही लोकांचे अहवाल पाॅझिटीव्ह येण्याची शक्यता एका अधिका-याने व्यक्त केली.  

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

सध्या कोथरूडमधील 104 लोक होम क्वारंटाइन असून 42 लोक रूग्णालयात देखरेखीखाली आहेत. महापालिकेच्या क्वारंटाइन केअर सेंटरमध्ये देखरेखीखाली असलेल्यांची संख्या 81 आहे. या लोकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यावर त्यांना घरी होम क्वारंटाईन करण्यात येईल..

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

रूग्णाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे,  त्यांना क्वारंटाईन करणे, परिसरात औषध फवारणी करणे व  तपासणी अहवाल मिळणे ही प्रक्रिया खुप संथ आहे. त्याचा वेग वाढविणे गरजेचे आहे, असे मत स्थानिक रहिवाशी नितीन गायकवाड यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kothrud in a red zone