
कोथरूड : कोथरूडमधील गणंजय सोसायटी परिसरात असलेल्या माथवड इमारतीतील पाण्याच्या टाकीत सांडपाणी शिरल्याने रहिवाशांचे पाण्यावाचून हाल झाले. गुरुवारी (ता. १२) रात्री नऊनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा सोसायटीच्या पार्किंगमध्ये सांडपाणी शिरले. या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते थेट सोसायटीतील पाण्याच्या टाकीत शिरले. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आता काय करायचे, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.