Citizens gathered to oppose the felling of trees voiced their sentiments and warned of launching an intense protest.
sakal
कोथरूड - विकास आराखड्यातील (डीपी) २० मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्यासाठी सुमारे ४८० हून अधिक वृक्षांची कत्तल करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. या वृक्षतोडीविरोधात कोथरूडमधील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून, सिद्धार्थ टॉवर्स येथे एकत्र येत नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. झाडे वाचवण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढवत प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
मृत्युंजयेश्वर मंदिरामागील सर्व्हे क्रमांक १२/२ आणि १२/५ या सरकारी जागेतून हा रस्ता प्रस्तावित आहे. मागील आठवड्यात प्रशासनाने येथे झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे हे काम तात्पुरते थांबवण्यात आले. याप्रकरणी महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावली असून माहिती अधिकारांतर्गत माहितीही मागवण्यात आली आहे.