esakal | Vidhan Sabha 2019 : 'चंद्रकांत पाटलांसारखा उमेदवार लाभणे कोथरुडकरांचे भाग्य'
sakal

बोलून बातमी शोधा

Kothrudkar's fate to get candidates like Chandrakant Patil for Maharashtra Vidhans sabha 2019 says sanjay kakade

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''भारतीय जनता पक्षात व महाराष्ट्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे चंद्रकांत पाटील कोथरुडकरांना उमेदवार म्हणून लाभले आहेत. कोथरुडकरांचे हे भाग्य असून चंद्रकांत दादांमुळे कोथरुडच्या विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले. 

Vidhan Sabha 2019 : 'चंद्रकांत पाटलांसारखा उमेदवार लाभणे कोथरुडकरांचे भाग्य'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''भारतीय जनता पक्षात व महाराष्ट्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे चंद्रकांत पाटील कोथरुडकरांना उमेदवार म्हणून लाभले आहेत. कोथरुडकरांचे हे भाग्य असून चंद्रकांत दादांमुळे कोथरुडच्या विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले. 

कोथरुड विधानसभा मतदार संघातील सुतारवाडी भागात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी, आबा सुतार, श्याम देशपांडे, सर्व स्थानिक नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

''चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने मोठ्या पदावर काम करीत असलेली व्यक्ती कोथरुडला उमेदवार आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षांत न झालेली कामे आता अधिक वेगाने होतील. कोथरुडच्या मतदारांना विकासाची दृष्टी आहे. त्यामुळे चंद्रकांत विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

loading image
go to top