सातारा कोयना धरणातून विसर्गात घट

सातारा कोयना धरणातून विसर्गात घट
Published on

कोयना धरणातून विसर्गात घट
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून एक फुटावर आली आणण्यात आले. या दरवाज्यांतून ७५३५ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. याशिवाय पायथा विद्युतगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीपात्रात सध्या एकूण ८५८५ क्युसेक विसर्ग केला जात आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार, कोयना धरणात ९८.१४ टीएमसी (९३.२४ टक्के) एकूण, तर ९३.०२ टीएमसी (९२.९० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक १७,९२२ क्युसेक इतकी असून, धरणाची पाणीपातळी २१५८ फूट (६५७.७५८ मीटर) इतकी नोंदविली गेली आहे. गेल्या २४ तासांत कोयना येथे २० मिलिमीटर, नवजा येथे ३४ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार सांडव्यावरून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात बदल केला जाऊ शकतो, असे धरण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच स्थानिक ग्रामप्रशासन व संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com