घोरपडी - बी. टी. कवडे रोड येथे कोयता गँगची दहशत निर्माण करण्यासाठी पन्नास वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चार चाकी वाहने, बस, टेम्पो, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर कोयत्याने वार करून हॉटेलचे नुकसान केले आहे.