सावित्रीबाई फुले पुरस्कार शिकलगार यांना प्रदान
रावेत, ता. २२ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्र. ९७ च्या मुख्याध्यापिका सायरा शिकलगार यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले. राज्याचे दुग्धविकास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिकलगार यांनी आपल्या कार्यकाळात रावेत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे शाळेत राबवलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गुणवत्ता वाढीसाठी दिलेले योगदान यांची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘‘हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सहकारी आणि पालकांच्या विश्वासाचा सन्मान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देईल,’’ अशी भावना शिकलगार यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

