भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाडिक यांचा लोणावळ्यात गौरव
लोणावळा, ता.२७ : भारतीय जनता पक्षाच्या युवा आघाडीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे लोणावळा येथे शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने उत्साहात स्वागत आणि गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड. विजयराव पाळेकर, खजिनदार रवींद्र साठे, लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, विद्यमान उपनगराध्यक्ष देविदास कडू, माजी नगरसेविका बिंद्रा गणात्रा, माजी नगरसेवक गिरीश कांबळे, भाजप लोणावळा मंडल अध्यक्ष अनिल गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा परीजा भिलारे, मंगेश कदम, हर्षल होगले, गणेश साठे तसेच संघटनेचे संघटक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाडिक म्हणाले, ‘‘मी २०२२ पासून सक्रीय राजकारणात सहभागी झालो. वडिलांच्या राज्यसभेच्या निवडणुकीचा अनुभव जवळून घेतला. त्या काळात पक्षाची शिस्त आणि कार्यपद्धती समजली. त्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. समाजकारण करताना जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. पक्ष संघटना वाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत आज मला ही मोठी जबाबदारी देण्यात आली.’’
सत्काराबद्दल त्यांनी शिवक्रांती कामगार संघटना व स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. पुढील काळात लोणावळा शहरात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच युवकांना संघटनेच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी विविध राज्यस्तरीय उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

