कटफळ येथील शेतकऱ्यांशी कृषीदुतांनी साधला संवाद 

संतोष आटोळे 
शनिवार, 30 जून 2018

शिर्सुफळ (पुणे) : कष्टकरी शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा असल्याने शेतकरी टिकला तर देश टिकेल. शेतीचे तुकडे करून विकण्यापेक्षा प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेऊन आपल्यासमवेत देशाचा उत्कर्ष साधा असे आवाहन कृषीदूतांनी केले.

कटफळ (ता.बारामती) येथे कृषी महाविद्यालय बारामती येथील सहा कृषीदूत ग्रामीण भागात शेती कशी केली जाते.याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गावात निवासी आले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत व शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय बारामती येथे बी एस्सी अॅग्री चतुर्थ वर्षाचे शिक्षण घेत असलेले बुद्धभूषण सदाफुले, अभिजित खैरे, अभिषेक कदम, वैभव बनकर, अशोक कुमार, श्रीनाथ रेड्डी यांचा समावेश आहे. या कालखंडात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आधुनिक शेतीविषयी घेतलेले प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. यावेळी गावच्या वतीने सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, सदस्य कांतीलाल माकर, मुकिंद मदने, रेखा आटोळे, कस्तुरा कांबळे, भारत मोकाशी, ग्रामसेवक अमोल घोळवे, सतिश बोरावके, जहांगीर तांबोळी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: krushidut talks with farmers in katfal