

Grand Inauguration of Krushik 2026 in Baramati
Sakal
माळेगाव : बारामतीमधील कृषिक प्रदर्शनाचे हे अकरावे वर्ष आहे. बदलत्या जगाची बदलती शेती प्रत्यक्ष दाखविणारा हा उपक्रम आहे. यात नैसर्गिक शेतीपासून ते एआयपर्यंतचा होत असलेला प्रवास शेतकरी प्रत्यक्ष पाहू शकतात. अशा उपक्रमांमुळे राज्याची शेती व्यवस्था भक्कम होण्यास मदत होते. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी प्रदर्शन बघायला हवे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.