

Krushiratna Anil Meher received the Yash Jeevan Gaurav Award 2026 for excellence in agriculture, rural development, and farmer empowerment.
Sakal
नारायणगाव : कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, दीर्घकालीन व समाजाभिमुख कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘यश जीवन गौरव पुरस्कार 2026 नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांना आज प्रदान करण्यात आला.