चौदा वर्षांखालील क्रिकेट १

चौदा वर्षांखालील क्रिकेट १
Published on: 

फोटो ः सर्वेश जोशी

क्षेत्रम क्रिकेट अकादमीची विजयी सलामी

पुणे, ता. १७ ः ॲपेक्स स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट आयोजित चौदा वर्षांखालील गटाच्या ॲपेक्स करंडक‌ क्रिकेट स्पर्धेत क्षेत्रम अकादमीने परब अकादमीचा १२६ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
मुळशी तालुक्यातील इन्फिनिटी क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना क्षेत्रम अकादमीने ८ बाद २०८ धावा केल्या. या वेळी सर्वेश जोशीने ४८ चेंडूंत पंधरा चौकार आणि एका षट्कारासह ८४ धावांची खेळी केली. स्वरांगी शिंदेने चार गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना परब अकादमीचा डाव ८२ धावांत आटोपला. आराध्य नागवेकरने चार तर फहाद खानने तीन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान सर्वेश जोशीने मिळविला.
या स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी क्षेत्रम अकादमीचे संचालक गणेश जोशी, परब अकादमीचे मुख्य प्रशिक्षक दीपक परब, ॲपेक्स स्पोर्ट्‌स मॅनेजमेंटचे शिवा धनगर आणि ओंकार मुगलगिद्दीकर हे उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक ः
क्षेत्रम अकादमी - (२५ षटकांत) ८ बाद २०८ (सर्वेश जोशी ८४, वेदांत पाटील २६, प्रज्वल खोपडे २३, स्वरांगी शिंदे ४-२७, ऐंजल शेट्टी २-३१) वि.वि. परब अकादमी - (१६.२ षटकांत) सर्वबाद ८२ (स्वरागी शिंदे २६, आराध्य नागवेकर ४-१३, फहाद खान ३-१५, सर्वेश जोशी २-६).
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.