
पुण्यातील कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीचा सध्याचा जबाबही गांभीर्यानं घ्यायला हवा असं मत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्हे यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणाचं राजकीय भांडवलं केलं गेलं असा आरोपही यावेळी गोऱ्हे यांनी केला. (Kuchik rape case present answer of victim should also be taken seriously Neelam Gorhe)
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज पु्ण्यातील रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीनं तिचं वेगळं मत व्यक्त केलं आहे. कुठलीही घटना समोर आल्यावर जितक्या लवकर होईल किंवा तिची मानसिक तयारी होईल तेव्हा कलम १६४ अंतर्गत तिचा जबाब नोंदवून घेतला जातो. आपल्याकडे तक्रार आल्यानंतर आपण पोलिसांकडे तक्रार देतो. पण या घटनेत असं दिसंय की आधीच्या घटनेपेक्षा या मुलीनं वेगळा जबाब नोंदवला आहे. युनायटेड नेशन्सनं किंवा सर्व राष्ट्रीय महिला आयोग असतील यांनी कायम पीडित मुलीवर विश्वास ठेवायला हवा. पण तिच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे तपासून घेण्याच काम न्याय यंत्रणेचं असतं. पण जणूकाही आपण स्वतःच न्यायव्यवस्था आहोत असं जर सांगत बसलो की काय हेतं ते आज आपण पाहिलं, अशा शब्दांत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता टीका केली.
पीडितेवर आधी दबाव होता की आता दबाव आहे यावर राजकीय भूमिका घेणं योग्य नाही. या प्रकरणाचं राजकीय भांडवलं केलं गेलं. तिच्या जखमांवर मीठ चोळून राजकीय हेतूसाठी तिच्या जखमांचा बाजार मांडला गेला. यामध्ये या मुलीचा आधीचा जबाब आणि आत्ताचा जबाबही गांभीर्यानं घ्यायला हवं, असंही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, एक दिशाभूल करण्याचं वातावरण तयार केलं गेलं की पीडितेला कोणीच मदत केली नाही. २५ फेब्रुवारीला पीडित मुलीचा मला फोन आला तिच्याशी मी २५ ते ३० मिनिटं बोलले. तिची तब्येत बरी नसल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तक्रारीसाठी मी पोलिसांशी संपर्क साधला, असंही यावेळी गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.