

Authorities have issued a precautionary alert for residents living along the Mina River as inflows into Vadj Dam continue to rise.
Sakal
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणात 7.18 टीएमसी(24.20 टक्के ) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.