करमाळा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा होणे गरजेचे : घनश्याम शेलार कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन

करमाळा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा होणे गरजेचे : घनश्याम शेलार कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन
Published on: 

KOR26B11100
करमाळा : कुकडी प्रकल्पाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना माजी आमदार घनश्याम शेलार. यावेळी उपस्थित विलासराव घुमरे, सभापती पूजा ढेरे व इतर.
---
बोगदा केल्यास कुकडीचे पाणी करमाळ्यात
घनश्याम शेलार; कायमस्वरूपी पाण्यासाठी पाठपुराव्याचे आवाहन
करमाळा, ता. ४ : आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह धरण जोड प्रकल्पाला केलेला विरोध चुकीचा असून, त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी डिंभे-माणिकडोह या दोन धरणांना जोडणारा बोगदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीगोंद्याचे माजी आमदार घनश्याम शेलार यांनी केले.
करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी (ता. ४) करमाळा येथे आयोजित बैठकीत शेलार बोलत होते. या वेळी पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, दिग्विजय बागल, सुजित बागल, पंचायत समिती सदस्य भरत आवताडे आदी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, कुकडी प्रकल्प करमाळ्यापासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पाचा करमाळा तालुक्याला कायमस्वरूपी लाभ मिळवून देण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा महत्त्वाचा आहे. कुकडी प्रकल्प ते करमाळा या मार्गावरील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींशी कुकडीच्या पाण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनीही पाठपुरावा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे डिंभे- माणिकडोह बोगदा निर्माण कृती समितीच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन शेलार यांनी केले.
बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या लाभाबाबत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे शेलार यांनी निरसन केले. कुकडी लाभक्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी या बैठकीस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com