Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात ऑगस्टअखेर ९३ टक्के (२७.५९ टीएमसी)  उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
kukadi project

kukadi project

sakal

Updated on

नारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात ऑगस्टअखेर ९३ टक्के (२७.५९ टीएमसी)  उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील दहा वर्षांचा आढावा घेता ऑगस्टअखेर प्रथमच कुकडी प्रकल्पात उच्चांकी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या साठ्यामुळे लाभ क्षेत्रातील सात तालुक्यांची रब्बी हंगामातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या सिंचनाची चिंता मिटली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com