कुर्डू येथे भव्य ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ बैलगाडी शर्यतीचे आयोजन

कुर्डू येथे भव्य ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ बैलगाडी शर्यतीचे आयोजन

Published on

KRU26B02586

कुर्डू येथे ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ बैलगाडी शर्यतीचे आयोजन

कुर्डू ः तीर्थक्षेत्र श्री नागनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त कुर्डू येथे ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मानाच्या या शर्यतीकडे परिसरातील शेतकरी, बैलगाडी मालक व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, २० मार्चला सकाळी ९.०० वाजता एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी होणार असून प्रवेश फी १००० रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके व मानाची ढाल ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांकासाठी १०हजार, द्वितीय ८ हजार, तृतीय ६ हजार, चतुर्थ ४ हजार, पाचवा ३ हजार, सहावा २ हजार तर सातवा १,००० रुपये अशी बक्षिसांची रचना आहे. शर्यत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमांनुसार पार पडणार असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. मैदान सकाळी ९ वाजता सुरू होणार असल्याने स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com