चासला रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
चास, ता. २२ चास (ता. खेड) येथे श्री कुंडमाऊली देवीचा यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शनिवारी (ता. २१) झालेल्या शर्यतीत १५० बैलगाडे धावले.
या शर्यतीत फळीफोडमध्ये प्रथम क्रमांक श्रीयांश तोत्रे- गटे जुगलबंदी यांच्या गाड्याने, द्वितीय अमोल चासकर व संदिप ढमढेरे यांच्या गाड्याने, तृतीय योगेश नाईकरे यांच्या गाड्याने, तर चतुर्थ क्रमांक राजवीर संजय बांगर यांच्या गाड्याने मिळवला.
अतिंम शर्यतीत पहिला क्रमांक दक्ष प्रवीण गायकवाड, बाळासाहेब नाईकरे, गणेश वाळुंज व जयसिंग गावडे यांच्या गाड्याने, द्वितीय क्रमांक माजी सभापती अंकुश सुदाम राक्षे, भानुदास मुळूक- सातकर जुगलबंदी, तृतीय क्रमांक मयूर निगडे, अक्षय मुळूक, दीपक कडलग व अविनाश मुळूक यांच्या गाड्याने, चतुर्थ क्रमांक उल्हास गणपत हुंडारे व सचिन शिंदे-महेंद्र शिंदे जुगलबंदी यांच्या गाड्याने, पाचवा क्रमांक अरुण शिंदे, सनिका टोके, दिगंबर सावंत व जितू गायकवाड यांच्या गाड्याने मिळवला. घाटचा राजा बहुमान दिपक कडलग व अविनाश मुळूक यांच्या गाड्याने मिळवला. घाटात सेकंद लिखानाचे काम लक्ष्मण चासकर व अंकूश रासकर यांनी पाहिले. शनिवारी रात्री भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांच्या वतीने साहसी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके कौस्तुभ अमोल रासकर यांच्या मार्फत सादर करण्यात आली. पालखीचे नियोजन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, कुंडमाऊली विकास परिसर समिती, प्रवीण ढमाले, सचिन शिंदे, बबन चौरे, सुनील चौरे, दत्तात्रेय रासकर, बाळासाहेब देवकर, मुरलीधर देवकर, दादा गायकवाड यांनी केले.
04429
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

