
पुणे : कुंडमळा येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची जबाबदारी घेण्यास सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद या दोघांनीही स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे या पुलाचा मालक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे काय, ते समोर येणार आहे.