Loni Kalbhor : कुंजीर लॉन्ससमोरून हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला; पाच दिवसांनी मालकाला आठवण झाल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला

Two-Wheeler Theft | Kunjir Lawns Pune : कुंजीरवाडीतील कुंजीर लॉन्ससमोर सर्व्हिस रोडवर पार्क केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी हँडल लॉक तोडून अज्ञात चोरट्याने पळवली. पाच दिवसांनी मालकाला चोरी झाल्याचे समजले.
Two-Wheeler Theft | Kunjir Lawns Pune

Two-Wheeler Theft | Kunjir Lawns Pune

sakal 

Updated on: 

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील कुंजीर लॉन्स समोरील सर्व्हिस रोडवर लॉक करून पार्क केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल पाच दिवसांनंतर दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मालकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Loading content, please wait...

Related Stories