ZP Health: कुंजीरवाडी आरोग्य केंद्रात रेबीज लस टंचाई; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लस टंचाई; जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दाव्यांना छेद, फोनवरील संभाषणातून अधिकाऱ्यांतील बेबनाव उघड
Healthcare Crisis: No Rabies Vaccine at Loni-Kalbhor's Kunjirwadi Health Center

Healthcare Crisis: No Rabies Vaccine at Loni-Kalbhor's Kunjirwadi Health Center

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी रेबीजची लस उपलब्ध नाही,खाजगी मेडिकल मधून घेऊन या असे सांगत ती देणे टाळले जाते,यावर शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे यांना फोन वर विचारले असता ते म्हणाले जिल्ह्यात मुबलक लस पुरवठा आहे व उपलब्ध ही आहे.तर त्यांच्याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.भांगले सांगतात लस उपलब्ध नाही.या दोघांशी भ्रमणध्वनीवर एकत्रित संभाषण केले असता त्यांच्यातील बेबनाव उघड झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com