Sangli News: लग्नासाठी तरुणीवर दबाव, एकतर्फी प्रेमातून टॉवरवर चढला; 'वीरू'ला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Youth Climbs Mobile Tower After Dispute: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत युवक टॉवरवर चढला. पोलिसांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला सुरक्षित खाली आणले.
Sangli News

Sangli News

esakal

Updated on

कुपवाड: लग्नासाठी तरुणीवर दबाव टाकत आत्महत्येची धमकी देणाऱ्या युवकाला कुपवाड पोलिसांनी आज ताब्यात घेतले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली आणले. अजय अविनाश जाधव (वय २२, रा. लिंगायत गल्ली, कुपवाड) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाचा एका तरुणीसोबत वाद झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com