कुर्डू व परिसरात ऑनलाइन जुगाराचा सुळसुळाट; ''चक्री''चे रॅकेट हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक लक्ष देणार का?

कुर्डू  व परिसरात ऑनलाइन जुगाराचा सुळसुळाट; ''चक्री''चे रॅकेट हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक लक्ष देणार का?
Published on: 

कुर्डूत चक्री गेमचे पुन्हा पेव; रोज ४० लाखांची उलाढाल
८ मुख्य डीलर, २३ एजंट सक्रिय असल्याची चर्चा; तक्रारी देण्यास फसवणूकग्रस्तांची टाळाटाळ

सकाळ वृत्तसेवा
कुर्डू, ता. १९ : पावणेदोन वर्षांच्या शांततेनंतर कुर्डू व परिसरात ऑनलाइन चक्री गेमने पुन्हा डोके वर काढले आहे. या अवैध धंद्यातून दररोज सुमारे ४० लाखांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. ८ मुख्य डीलर आणि २३ एजंट सक्रिय असल्याचे बोलले जात असून, बदनामीच्या भीतीने फसवणूकग्रस्त तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये लऊळ येथील बालाजी खारे यांनी जमीन विक्रीतून मिळालेले ७८ लाख रुपये गमावल्यानंतर तक्रार दिली होती. तपासात ३६ कोटी ३३ लाख ६७ हजार ६२८ रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार उघड झाले. २३ जणांवर गुन्हे दाखल करून ११ जणांना अटक करण्यात आली होती. जूनमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले. सध्या आरोपी जामिनावर आहेत.

कोट
- चक्री गेम पुन्हा सुरू असल्यास आर्थिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या मदतीने कारवाई करू. फसवणूक झालेल्यांनी थेट संपर्क साधावा. हा गेम हद्दपार करू.
अतुल मोहिते, पोलिस निरीक्षक, कुर्डुवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.