कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे ठार

कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे ठार

Published on

कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे ठार

कुर्डुवाडी, ता. २४ः कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर म्हैसगाव (ता. माढा) शिवारात एका रात्रीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती ठार झाल्या.‌ या दोन्ही घटना सोमवारी (ता. २३) च्या रात्री घडल्या. या घटनांची कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अनिल भारती (३७, रा. महादेववाडी, ता. माढा) व सागर गायकवाड (रा. रिधोरे ता. माढा) अशी मृतांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत लक्ष्मण भारती (रा. महादेववाडी, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल भारती हे बार्शी येथील नातेवाईकांकडून दुचाकी (एमएच ४५/ एवाय ५४३२) वरून परत येत होते. सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास म्हैसगाव हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. फिर्यादीने तेथील लोकांच्या मदतीने कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले असता, उपचारापूर्वी ते मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसऱ्या घटनेत  संदिपान गायकवाड (रा. रिधोरे, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सागर गायकवाड ट्रकचालक आहेत. ते कुर्डुवाडीहून दुचाकी (एमएच ४५/के ४३१२) वरुन परत येत होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास म्हैसगाव हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन पडले होते. पेट्रोलिंग करताना पोलिसांना हे समजताच पोलिसांनी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com