समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी सहाय करु- पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी
KDW26B04801
कुर्डुवाडी (ता. माढा) : शिबिरात गरजू बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करताना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतुल मोहिते व अन्य.
समाजातील वंचित घटकांना मदत करणार ः पोलिस अधीक्षक
कुर्डुवाडीत पहाट कार्यक्रमांतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप; विविध मंडळांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. २७ : समाजातील वंचित घटकांतील बांधवांची उन्नती व विकास होण्यासाठी त्यांना लागणारे सर्व प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे, कागदपत्रे मिळवून देण्यासाठी व शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
‘पहाट’ उपक्रमांतर्गत येथील कुबेर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आदिवासी विकास मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात ९ गरजू पारधी समाज बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
व्यासपीठावर सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस., पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, आदिवासी विकास प्रकल्पाचे डी. वाय. सरतापे, नायब तहसीलदार पांडुरंग भडकवाड, श्री. ठोंबरे, दीपक शिरोळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अतुल मोहिते यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
या शिबिरामध्ये आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, शासकीय दाखले काढण्याबाबत मार्गदर्शन करुन आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्ती, कौशल्य विकास कार्यक्रम व योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी कुर्डुवाडी पोलिस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलपैकी अधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोध लावण्यात आलेले १० मोबाईल मालकांना परत देण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, शहनवाज मुल्ला, पोलिस उपनिरिक्षक सारिका गटकूळ, स्वामिनाथन लोंढे, विजय घोगरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
डीजेमुक्त मिरवणुकीबद्दल सत्कार
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा उपयोग केल्याबद्दल कुर्डुवाडी पोलिस ठाणे हद्दीतील ११ शिवजन्मोत्सव मंडळे व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. मावळा ग्रुप, जय भवानी ग्रूप, एस. बी. ग्रुप भोसरे, शिवप्रतिष्ठान ग्रुप शिराळ, स्वराज्य प्रतिष्ठान, राजमुद्रा प्रतिष्ठान कव्हे, शिवजयंती महोत्सव रोपळे, शिवभक्त प्रतिष्ठान महादेववाडी, शिवप्रतिष्ठान ग्रुप पिंपळखुंटे, रुद्रेश्वर प्रतिष्ठान रिधोरे, शिवप्रेमी ग्रूप म्हैसगाव या मंडळांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

