

२३ गोवंश जनावरांची सुटका;
साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. १५ : कत्तलीच्या उद्देशाने जनावरे भरून टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने येणारी चारचाकी पोलिसांनी पकडली. या कारवाईत २३ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच वाहनासह एकूण पाच लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ता. १० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुर्डुवाडी येथील बाह्यवळण रस्त्यावर करण्यात आली.
पोलिस हरीचंद्र चाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चालक अस्लम गणी कुरेशी (रा. चवसाळा, जि. बीड) आणि मुसबर अलम रशीद कुरेशी (रा. बहादूरगंज, बिहार) या दोघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चाकणे हे सहकाऱ्यांसह कुर्डुवाडी हद्दीत गस्त घालत असताना गोरक्षकांकडून टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीकडे चारचाकीमधून (क्र. एमएच ११ बीएल १६२९) कत्तलीच्या उद्देशाने जनावरे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंढरपूर चौकात सापळा रचून संबंधित वाहन थांबवले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाच्या हौदाची पाहणी केली असता त्यात लहान-मोठी अशी एकूण २३ जनावरे कोंबून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.