माझा प्रभाग माझे व्हिजन
माझा प्रभाग माझे व्हिजन
कुर्डुवाडी नगरपरिषद
KDW26B04784
विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी सुरू करणार
कुर्डुवाडी : प्रभागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससी यासह सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी ई-लायब्ररी उभी करणार आहे. त्याचे काम सुद्धा प्रगतिपथावर आहे. या ई-लायब्ररी अभ्यासिकेचा उपयोग सर्व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.
रेल्वे लाईनमुळे माझ्या प्रभागातील नागरिकांना शहर व इतर भागात जाण्या-येण्यासाठी कनेक्टिव्हिटीची अडचण येते. त्यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून ओव्हरब्रीज करून पालखीमार्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला आहे. शासनाच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. या योजना पोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सध्या वीजेचे बिल वाढत आहे. वाढते बिल थांबवण्यासाठी प्रभागातील प्रत्येकाच्या घरी सोलार विद्युत ऊर्जा युनिट बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चांगले रस्ते, पथदिवे, स्वच्छता आरोग्य या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करून घेणार आहे.
- संजय टोणपे, नगरसेवक, कुर्डुवाडी
-------
KDW26B04785
प्रभागातील अंतर्गत रस्ते प्राधान्याने चांगले करणार
कुर्डुवाडी : माझ्या प्रभागातील अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे करून घेणे याला माझे प्राधान्य असणार आहे. प्रभागातील काही ठिकाणी भुयारी गटारीच्या अडचणी आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडवून तेथील रस्ते चांगल्या प्रतीचे करणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, वायफायसह सर्व सुविधा असलेली अभ्यासिका उपलब्ध करून देणार आहे. प्रभागात ठराविकवेळी नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी संबंधित विभागाकडे नियोजन करून देणार आहे. आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देत घंटागाडी नियमितपणे सुरू करणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडवविण्यासाठी तत्पर राहणार आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रभागात विकासकामे करणार आहे.
- शुभ्रा गोरे, नगरसेवक, कुर्डुवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

