स्वतःच्याच घरातून दागिने चोरून पळून गेलेल्या मुलीस अटक.. एक दिवसाची पोलिस कोठडी

स्वतःच्याच घरातून दागिने चोरून पळून गेलेल्या मुलीस अटक.. एक दिवसाची पोलिस कोठडी

Published on

कुर्डुवाडीतील स्वतःच्याच घरातून दागिने
चोरून पळून गेलेल्या मुलीस अटक
.................
कुर्डुवाडी, ता. ६ : स्वतःच्या लग्नासाठी तयार केलेले ५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख ३ लाख रुपयांचा ऐवज कुर्डुवाडी (ता. माढा) येथील स्वतःच्याच घरातून चोरुन नेल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी मुलीस अटक करून माढा न्यायालयासमोर हजर केले. तिला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात मुली विरुद्ध नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. मुलगी ही पुणे येथे शिक्षणाकरिता राहण्यासाठी होती. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा साखरपुडा झाला. त्यानंतर तिचे ऑनलाइन क्लास करण्याचे ठरले. १३ नोव्हेंबर रोजी फिर्यादी दवाखान्यासाठी मुंबईला जाताना मुलीचे पुणे येथील सामान घेऊन येण्यासाठी तिला चारचाकी गाडीत नेले व रूमवर सोडले. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईहून परत येताना त्यांनी तिला फोन करून सामान भरून हडपसरला यायला सांगितले. परंतु तिने फोन बंद केला व आली नाही. सगळीकडे चौकशी केल्यानंतर फिर्यादी कुर्डुवाडीला आले. घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की मुलीने काहीही न सांगता घरातून तिच्या लग्नासाठी तयार केलेल्या २ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ५ सोन्याच्या अंगठ्या, रोख ३ लाख रुपये असा ५ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. नुकतेच पुणे पोलिसांनी या मुलीस मिसिंग घटनेत ताब्यात घेतले होते. कुर्डुवाडी पोलिसांनी चोरीप्रकरणी तिला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com