कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात कर वाढ नाही .. ४ लाख ७५ हजार रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प अंदाजपत्रक
PNE26V99252
कुर्डुवाडी (ता. माढा) : नगरपरिषद अर्थसंकल्प सादर करताना उपस्थित नगराध्यक्षा जयश्री भिसे, उपनगराध्यक्ष सविता जगताप, मुख्याधिकारी सचिन तपसे.
कुर्डूवाडी नगरपरिषदेकडून कर वाढ नाही
अर्थसंकल्प सादर; वर्षभरात खर्चणार ८२ कोटी रुपये; चार लाख राहणार शिल्लक
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. २६ : कुर्डुवाडी नगरपरिषदेने सन २०२६-२७ चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ न केली नाही. वर्षभरात विविध कररूपाने ८२ कोटी ४ लाख ५१ हजार ४३१ रुपये जमा होणार आहेत. तर ८१ कोटी ९९ लाख ७६ हजार ३२१ रुपये खर्च होणार आहे. ४ लाख ७५ हजार १०९ रुपयांचा शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले.
नगरपरिषदेच्या कै.काशिनाथ भिसे सभागृहात घेण्यात आलेल्या सभेत सन२०२५-२६ चा सुधारित अंदाज व सन २०२६-२७ चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री भिसे होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सविता जगताप, मुख्याधिकारी सचिन तपसे हे होते. कार्यालयीन अधीक्षक बापू चौबे व लेखापाल धनंजय जाधवर यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी वृषाली गांधी यांनी करवसुली, रेल्वे पाणीपुरवठा याबाबत, समीर मुलाणी यांनी रिकामे असलेले व्यावसायिक गाळे, संजय टोणपे यांनी पाणीपुरवठा याबाबत तसेच जगन्नाथ क्षीरसागर, डॉ मोहसिन मकणू यांनीही प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाच्या वतीने उत्तर देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उबाठा) चे गटनेते ऋषीपाल वाल्मिकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते समीर मुलाणी, नगरसेविका वृषाली गांधी, अंजली गावडे, रेशमा गोरे, धनंजय डिकोळे, संजय टोणपे, अमरकुमार माने, भाग्यश्री पाटील, स्नेहा गवळी, शुभ्रा गोरे, पल्लवी कांबळे, सरस्वती क्षीरसागर, शकील तांबोळी, अबोली चौधरी, वसीम मुलाणी शाहिस्ता चाऊस, आनंद कदम आदींसह अन्य उपस्थित होते.
असे आहे अंदाजपत्रक
जमा - नगरपालिकेला दर व कररूपाने मिळालेली रक्कम ४ कोटी ४९ लाख ९४ हजार ९ रुपये, विशेष अधिनियमांतर्गत वसुली ८४ लाख २ हजार १ रुपये, नगरपालिकेच्या मालमत्ता व उपयोगिता सेवांपासून प्राप्त कर १ कोटी ५ लाख ६ हजार रुपये, अनुदान व अंशरूपाने जमा ५२ कोटी ४३ लाख रुपये, संकीर्ण जमा ८ कोटी ६६ लाख ६६ हजार व प्रारंभीची शिल्लक १४ कोटी ५६ लाख ६८ हजार ४२९ रुपये असे एकूण ८२ कोटी ४ लाख ५१ हजार ४३१ रुपये दर्शवण्यात आली आहे.
खर्चाची बाजू- सामान्य प्रशासन व कर वसुलीसाठी ११ कोटी १७ लाख ९१ हजार ६८० रुपये, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ९० लाख ५५ हजार रुपये, आरोग्य व सोयीसाठी ५ कोटी ५३ लाख ४१ हजार ८०० रुपये, शिक्षणासाठी ४ लाख १० हजार रुपये, अनुदान व अंशदानासाठी ६१ कोटी ६२ लाख ५० हजार ५०० रुपये व संकीर्ण २ कोटी ७१ लाख २७ हजार ३४१ रुपये असा एकूण खर्च ८१ कोटी ९९ लाख ७६ हजार ३२१ रुपये दर्शवण्यात आले आहेत. अंतिम शिल्लक ४ लाख ७५ हजार १०९ रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

