esakal | दुधाच्या कॅनमधून ताडी वाहतूक करणाऱ्या पिकअपवर पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

At Kurkumbh in Daund taluka a pick up police transporting toddy from a milk can took action

यावेळी पथकाने 450 लिटर ताडी किंमत 14 हजार पाचशे व बोलेरो पिकअप जीप किंमत पाच लाख रूपये असा पाच लाख 14 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा कारवाई केलेला मुद्देमाल दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे 

दुधाच्या कॅनमधून ताडी वाहतूक करणाऱ्या पिकअपवर पोलिसांची कारवाई

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुभ : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे दुधाच्या कँनमध्ये वाहतूक करणारी ताडी व बोलेरो पिकअप जीपसह 5 लाख 14 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे पथकाने जप्त केला.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने बुधवारी (ता. 4) दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना कुरकुंभ येथून एक व्यक्ती बोलेरो पिकअप जीपमधून दुधाच्या कॅनमध्ये ताडी वाहतूक करताना दिसून आला. या पिकअपवर 40 लिटर क्षमतेचे पाच प्लास्टिकचे दुधाचे कॅन व एक प्लास्टिक टाकीमध्ये ताडी विक्रीसाठी घेऊन जाताना निदर्शनास आले.

याप्रकरणी पथकाने प्रकाश शामराव भंडारी (वय.32 रा. रणगाव, ता. इंदापूर जि.पुणे ) याला अटक करण्यात आली. यावेळी पथकाने 450 लिटर ताडी किंमत 14 हजार पाचशे व बोलेरो पिकअप जीप किंमत पाच लाख रूपये असा पाच लाख 14 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा कारवाई केलेला मुद्देमाल दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे 
 
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलिस हवालदार सचिन गायकवाड, अनिल काळे, रविराज कोकरे, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अभिजीत एकशिंगे यांच्या पथकाने केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top