
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एमक्युअर फार्मास्युटीकल लिमिटेड कंपनीच्या कोल्डस्टोअरेजमधून १६ ते २२ जुलै २०२२ दरम्यान दोन ड्रममधील ९१६ ग्रॅम मेलफालान हायड्रोक्लोराईड ही ३० लाख रूपये किंमतीची पावडर चोरीला गेली असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीची मजबूत सुरक्षाव्यवस्था व कुलूप बंद कोल्डस्टोअरेजमधून चोरी होतेच कशी? या चोरीने औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील पावडर व केमिकल चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एमक्युअर फार्मास्युटीकल लिमिटेड कंपनीचे अधिकारी राहुल हनुमंत मोरगांवकर, ( रा. मल्हार अपार्टमेंट, शालीमार चौक दौड, जि. पुणे. ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून १६ ते २२ जुलै २०२२ दरम्यान
एमक्युअर फार्मास्युटीकल कंपनीत औषध निर्मितीसाठी जी पावडर लागते ती बनवली जाते. ही बनवलेली पावडर कंपनीमध्ये ए.पी.आय.5-कोल्डस्टोरोज सी. आर. 1304 मध्ये ठेवली जाते. या कोल्डस्टोअरेजवर देखरेख, माल देण्याघेण्याचे व व्यवस्थापनाचे काम संतोषकुमार पेंटप्पा गुड़ेली हे करतात. त्यांच्या मदतीला समाधान दत्तात्रय जगताप हे मालचा तपशील ठेवण्याचे काम करतात. तर गुडेली यांच्याकडून चावी घेऊन संदीप ताराचंद सोनवणे व मंगेश केशव लगड हे कोल्डस्टोरोज करतात. करण्यासाठी कोल्डस्टोरोजचे सफाईचे काम करतात. १६ जुलैला गुंडेली टेबलावर कोल्डस्टोरोज चाव्या ठेवून केबीन लॉक केली. कॅबीनची चावी सुरक्षा विभागाकडे जमा करून सुट्टीवर गेले होते. १८ जुलैला समाधान जगताप कामावर आल्यावर कोल्डस्टोरोजच्या चाव्या सापडल्या नाही.
त्यामुळे १९ जुलैला त्यानंतर नवीन चाव्या बनवून घेतल्या होत्या. २२ जुलैला रात्री सातसव्वासातच्या दरम्यान कोल्डस्टोरोजमधील मेलफालान हायड्रोक्लोराईडमधील मटेरियल गुजरातला सानंद येथे पाठवायचं होते. त्यामुळे ते मटेरियल तपासणीसाठी कंपनीचे सुपरवायझर समाधान दत्तात्रय जगताप, सहाय्यक व्यवस्थापक संदीप नागनथ बारबोले गेले. त्यावेळी दोन ड्रममधील ९१६ ग्रॅम मेलफालान हायड्रोक्लोराईड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
त्यावेळी ९१६ ग्रॅम पावडरची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. बाजारपेठेत एक ग्रॅमची किंमत ३२७५ रूपये असून चोरी गेलेल्या पावडरची किंमत ३० लाख रूपये आहे. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द भारतीय दंड संहिता कलम ४५४, ४५७ व ३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व कर्मचारी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.