

Threshing Machine Accident
sakal
नसरापूर : कुरंगवडी (ता. भोर) येथे शेतातील वाटाणा, मसूर यंत्राद्वारे भरडत असताना डोक्याचा स्कार्फ यंत्रामध्ये अडकल्याने यंत्रात ओढल्या गेल्याने झालेल्या गंभीर दुखापतीत महिलेचा मृत्यू झाला. शुभांगी नीलेश राऊत (वय ४१) असे या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली.