दिव्यांग लाभार्थ्यांनी केवायसी पुर्ण न केल्यास पेन्शन बंद करणार
केवायसी पूर्ण न केल्यास दिव्यांगांची पेन्शन बंद करणार ः विकास अहीर
दहिवडी, ता. २१ : सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करून आपले यूडीआयडी कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड संजय गांधी शाखा तहसील कार्यालय माण दहिवडी येथे रविवारपर्यंत (ता. २२) जमा करावे, अन्यथा आपली पेन्शन एक एप्रिलपासून बंद होऊ शकते, असा इशारा तहसीलदार विकास अहीर यांनी दिला आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दिव्यांगांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करून केवायसी करणे अनिवार्य आहे, तरी माण तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करून आपले यूडीआयडी कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड संजय गांधी शाखा तहसील कार्यालय माण दहिवडी येथे जमा करावे. यासाठी शनिवारी कार्यालय सुरू होते, तसेच रविवार २२ मार्च रोजी कार्यालयीन सुटी दिवशीही संजय गांधी शाखा चालू राहील, तरी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी रविवारी संध्याकाळपर्यंत केवायसी पूर्ण करून घेऊन यूडीआयडी कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधारकार्ड यांची छायांकित प्रत या शाखेत सादर करावी अन्यथा आपली पेन्शन एक एप्रिलपासून बंद होऊ शकते, असा इशारा तहसीलदार विकास अहीर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

