esakal | लैंगिक शिक्षणाअभावी कुमारी मातांत होतेय वाढ - डॉ. राणी बंग

बोलून बातमी शोधा

Dr-Rani-Bang

‘लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे. तरुणांनी चांगले वर्तन ठेवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.

लैंगिक शिक्षणाअभावी कुमारी मातांत होतेय वाढ - डॉ. राणी बंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे. तरुणांनी चांगले वर्तन ठेवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय व रोटरी क्‍लब ऑफ जुन्नरच्या वतीने आयोजित केलेल्या तारुण्यभान शिबिरात डॉ. बंग यांनी महाविद्यालयीन युवक-युवतींना मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे यांच्या हस्ते डॉ. बंग यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बंग म्हणाल्या, ‘‘विज्ञान व तंत्रज्ञान युगात स्त्रियांच्या विकासासाठी स्त्रीसक्षमीकरण चळवळ बळकट करणे आवश्‍यक आहे. चूल व मूल, रांधा, वाढा व उष्टे काढा या संकुचित मानसिकतेतून महिला व मुलींनी बाहेर पडणे आवश्‍यक आहे. मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, शारीरिक आकर्षण व खरे प्रेम यातील फरक योग्य वयात समजावून सांगणे आवश्‍यक आहे.’’ तात्यासाहेब गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. ए. आर. धेंडे यांनी नियोजन केले.