कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची हेळसांड

shirsufal
shirsufal

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची संख्या अधिक असल्याने त्यांना प्राथमिक सुविधा पुरविणे शक्य झाले नाही यामुळे रुग्ण महिलांची मोठी हेळसांड झाली. यामध्ये ज्या प्रमाणे जनावरे कोंडावित तशी एकाच खोलीत विस ते तीस महिलांना भूल देत विश्रांतीसाठी झोपवण्यात आले.यामुळे महिला रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे शिबीरांची संख्या वाढविण्याची मागणी केली.

शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शिर्सुफळ  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दर महिन्याला शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते. त्यानुरुप आज बुधवार (ता.30) रोजी शिबिर होते.यावेळी शिर्सुफळ परिसरासह भिगवण, सणसर, डोर्लेवाडी येथील महिलांनी सकाळ पासुनच सुमारे 70 महिला दाखल झाल्या होत्या.तसे पाहिले तर येथील रुग्ण अॅडमिट करण्याची क्षमता फक्त पाच महिलांची मात्र तेथे तीस महिलांना दाखल करण्यात आले. तर उर्वरित महिला शेजारील हाॅल मध्ये अॅडमिट करण्यात आले.महिलांना या शस्त्रक्रियेपूर्वी महिलांना बारा तास अन्नसेवन वर्ज्य करण्यास सांगण्यात येते.तसेच महिलांना देऊन पोट साफ होण्याच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. 

दाखल केलेल्या अनेक महिलांना कॉट नव्हते. त्यामुळे त्यांना चटईवर झोपावे लागले. पुरेशी जागा नसल्याने काही महिला बाहेर पटांगणात बसून होत्या. तर त्यांची मुले, त्यांच्यासह आलेले नातेवाईक यांना तर बाहेर कुठे उन्हात तर कोठे झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागला. यामुळे रुग्णांसह नातेवाईकानी नाराजी व्यक्त केली.

रुग्णांची संख्या वाढल्याने अडचण..
शिर्सुफळ येथील आरोग्य केंद्राचा विचार करताना स्थानिक रुग्णांना सर्व सुविधा पुरविण्याची क्षमता आहे.मात्र सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये साठींच्या संख्या अधिक झाली.यामुळे सदर परिस्थिती निर्मान झाली.यापुढे योग्य ती खबरदारी घेतली जाईल.
- डॉ. महेश जगताप, वैद्यकीय अधिकारी, बारामती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com