

Pune
esakal
धायरी: सिंहगड रस्त्यावरील लगड मळा परिसरात दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याऐवजी विरुद्ध दिशेला काम केल्याने मलनिस्सारण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपये खर्चूनही पहिल्याच पावसात रस्ता जलमय झाल्याने परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.