कन्याशाळा योग दिन

कन्याशाळा योग दिन
Published on

लाहोटी कन्या प्रशालेत योगदिन

कऱ्हाड ः शिक्षण मंडळ, कऱ्हाड संचलित स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये योगाचे महत्त्व विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवता यावे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, अधिकारी युवराज पाटील तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रशालेतील विद्यार्थिनी, शिक्षकवृंद तसेच महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची पार्श्वभूमी विषद केली.
मुख्याध्यापिका हेमलता जंगम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. नियोजन आणि समन्वय प्रशालेचे क्रीडा शिक्षक महेंद्र भोसले यांनी केले.
------------------------
28672
कऱ्हाड ः येथील योग शिबिरात सहभागी मान्यवर.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com